Lawyer Vikas Singh reacts: रियाचे समर्थन करणाऱ्यांवर वकील विकास सिंह नाराज

काही वाहिन्यांवर असे सांगितले जात आहे की सुशांतचा एक मोठा विमा होता, ज्यामध्ये तो आत्महत्या दर्शविला गेला तर त्याला पैसे मिळणार नाहीत, म्हणून कथा बदलली गेली.

एमपीसी न्यूज – अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी त्याच्या कुटुंबाची बाजू वकील विकास सिंह हे लढवत आहेत. आजवर फक्त सुशांतच्या कुटुंबाचीच बाजू माध्यमांनी समोर आणली होती. मात्र जेव्हा रिया चक्रवर्तीची बाजू लोकांसमोर आली तेव्हा याविषयी लोकांच्या मनात काही गोष्टी खटकू लागल्या. त्यामुळे बुधवारी विकास सिंह यांनी यासंबंधी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी त्यांनी रिया चक्रवर्तीवर त्याने अनेक आरोप केले. रिया चक्रवर्तीचे ‘समर्थन’ करणा-या मीडिया चॅनेलवर ते नाराज दिसले. विकास सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘काही वाहिन्यांवर असे सांगितले जात आहे की सुशांतचा एक मोठा विमा होता, ज्यामध्ये तो आत्महत्या दर्शविला गेला तर त्याला पैसे मिळणार नाहीत, म्हणून कथा बदलली गेली.

मला सांगायचे आहे की सुशांतचा कोणताही जीवन विमा नव्हता. हे एका आरोपीला वाचवण्याचे काम सुरु आहे. ते जर थांबले नाही तर ज्या वाहिन्यांवर ते चालत आहेत, त्याबाबत आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल’.

त्याचवेळी विकास सिंह यांनी हे स्पष्ट केले की जर कोणी सुशांतच्या जीवनावर चित्रपट बनवला किंवा पुस्तक लिहिले तर त्यांना सुशांतच्या वडिलांकडून परवानगी घ्यावी लागेल. परवानगी न घेता कोणी असे केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. नुकतेच एका चित्रपटाचे पोस्टर रिलिज झाले आहे. हे पोस्टर पाहून असे दिसते की ही कथा एका अभिनेत्याच्या आत्महत्येभोवती विणली गेली आहे.


रिया चक्रवर्ती सुशांतच्या आयुष्यात येण्यापूर्वीच अभिनेत्याची तब्येत बिघडल्याच्या प्रश्नावर विकास सिंह यांनी स्पष्टपणे सांगितले की, ‘आपल्या सर्वांनाच आपल्या आयुष्यात काही समस्या आहेत. अशा परिस्थितीत सुशांतच्या आईच्या मृत्यूदरम्यानही तो अस्वस्थ झाला होता, जसे की झोपेची समस्या इत्यादी. परंतु, आपण याला मानसिक आजार म्हणणार नाही. रिया चक्रवर्ती आयुष्यात आल्यानंतरच सुशांतला मानसिक समस्या उद्भवली’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.