Pimpri : लोकन्यायालयात 53 खटले निकाली; आकुर्डी मनपा न्यायालयात दंडासह विविध करांच्या स्वरूपात लाखो रूपयांची वसुली

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, दिवाणी व फौजदारी न्यायालय पिंपरी आणि पिंपरी चिंचवड अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 14) पिंपरी येथील न्यायालयात तसेच आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे लोकन्यायालयाचे आयोजन केले होते. पिंपरी न्यायालयात 53 खटले निकाली काढले तर, आकुर्डी मनपा न्यायालयात दंड व विविध करांच्या स्वरूपात लाखो रूपयांची वसुली झाली.

या कार्यक्रमात न्यायालयातील मुख्य न्यायाधीश ए.यु. सुपेकर आणि सहन्यायाधीश एन. टी.भोसले, सहन्यायाधीश डी.आर.पठाण, आर.आर. काळे तसेच सहन्यायाधीश आर. एन. मुजावर यांच्या उपस्थितीत तर, आकुर्डी न्यायालयामध्ये मे. एस. बी. देसाई यांच्या उपस्थितीत उदघाटन सोहळा पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष अ‍ॅड.सतीश गोरडे होते. प्रमुख उपस्थिती म्हणुन अ‍ॅड.राजेश पुणेकर, अ‍ॅड.साधना बोरकर होते. पिंपरी चिंचवड अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुनील कडुसकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. योगेश थंबा, सचिव अ‍ॅड. गोरख कुंभार, ऑडीटर अ‍ॅड. महेश टेमगिरे व सदस्य अ‍ॅड. रामचंद्र बोराटे, अ‍ॅड.पूनम राऊत, अ‍ॅड. केशव घोगरे, अ‍ॅड.सुनील रानवडे, अ‍ॅड.निलेश ठोकळ तसेच अ‍ॅड.विलास कुटे, अ‍ॅड.प्रतीक जगताप, अ‍ॅड.कुलदीप बकाल, अ‍ॅड.अतुल अडसरे, अ‍ॅड.सागर अडागले, अ‍ॅड.नारायण थोरात, अ‍ॅड.राजेश रणपिसे, अ‍ॅड.गणेश राऊत व इतर वकील वर्ग उपस्थित होते.

तर, या कार्यक्रमात बोलताना न्यायालयातील न्यायाधीश डी.आर पठाण यांनी लोक न्यायालयाचे सहभागी होण्याचे महत्व सांगितले. पिंपरी चिंचवड अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.सुनील कडुसकर यांनी जास्तित जास्त पक्षकारांनी लोकन्यायालयात सहभागी होवून खटले निकाली काढावेत, असे आवाहन केले.

आजच्या लोकन्यायालयात पॅनल परिक्षक म्हणून अ‍ॅड.प्रियंका कांबळे, अ‍ॅड.प्रज्ञा कुलकर्णी, अ‍ॅड.सुजाता कुलकर्णी, अ‍ॅड.निकिता चिंचवडे, अ‍ॅड. अमोल शेळके, अ‍ॅड.शोभा कदम, अ‍ॅड.क्षिप्रा धुंदी, अ‍ॅड. रुबी चाटवाल, अ‍ॅड.सचिन पाटील, अ‍ॅड.निनाळे, अ‍ॅड. महेश वाकळे, अ‍ॅड.जयश्री कुरूमकर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव अ‍ॅड.गोरख कुंभार यांनी केले तर, आभार अ‍ॅड. रामचंद्र बोराटे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.