Chinchwad : लक्ष्मण जगताप गुरुवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप गुरूवारी (दि. ३) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून रॅली काढण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे हा अर्ज जगताप सादर करणार आहेत. पिंपळेगुरव येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात सकाळी 9 वाजता दर्शन घेऊन या रॅलीला सुरूवात केली जाणार आहे. या रॅलीत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार जगताप यांनी केले आहे.

भाजपची उमेदवारी आमदार लक्ष्मण जगताप यांना चिंचवड विधानसभा मतदारसंघातून जाहीर झाली आहे. त्यानिमित्त मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. पिंपळेगुरव, सांगवी, पिंपळेसौदागर, रहाटणी, काळेवाडी, थेरगाव, वाकड, पिंपळेनिलख, वाल्हेकरवाडी, रावेत, किवळे, मामुर्डी या भागात कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून व पेढे वाटून जल्लोष साजरा केला. तसेच आमदार जगताप यांना सुमारे दोन लाखांच्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.