Pune: अन्यथा गोपीचंद पडळकरांना काळे फासू, दीपाली धुमाळ यांचा इशारा

leader of opposition deepali dhumal warns gopichand padalkar for his controversial statement on ncp leader sharad pawar

एमपीसी न्यूज- कोणतीही शारीरिक व बौद्धिक पातळी नसणारा हा माणूस असून भारतीय जनता पक्षाच्यावतीने गोपीचंद पडळकर यांच्या आमदारकीचा त्वरित राजीनामा घ्यावा. भाजपने पडळकर यांच्यावर कारवाई नाही केली तर ही पक्षाची ठरलेली रणनीती आहे हे सिद्ध होईल, अशा शब्दांत महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी टीका केली आहे. पुणे शहरात पडळकर यांना यापुढे बंदी घालण्यात यावी, अन्यथा कार्यकर्त्यांच्या वतीने काळे फासले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

सांगली आणि बारामती विधानसभा मतदार संघात झालेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागली आहे. भाजपच्यावतीने मिळालेली विधान परिषदेची आमदारकी यातून उतराई करण्याच्या हेतूने गोपीचंद पडळकर यांनी अतिशय खालच्या पातळीवर महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

आपले धनगर समाजातील स्थान शून्य झाल्याने पक्षाला काहीतरी आक्रमक करण्याच्या हेतूने पडळकर यांनी आज पंढरपूरमध्ये पवार यांच्यावर टीका केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यावर टीका करताना पडळकर यांनी पातळी सोडली आहे. पुणे शहरात गोपीचंद पडळकर यांना यापुढे बंदी घालण्यात यावी, अन्यथा कार्यकर्त्यांच्या वतीने काळे फासले जाईल, असा इशाराही दीपाली धुमाळ यांनी दिला आहे.

पडळकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार अशा कोणत्याच ज्येष्ठांचा मान ठेवता येत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.