Aundh : आंबेडकर महाविद्यालयात वित्तीय साक्षरता या विषयावर मार्गदर्शन

एमपीसी  न्यूज –  औंध येथील रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय येथे मुंबईचे पंकज मटकर  यांचे ‘वित्तीय साक्षरता’  या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पंकज मटकर म्हणाले की, जागतिकीकरणाच्या युगात आपण फक्त साक्षर असून चालणार नाही. तर आपण वित्तीय साक्षर असणेसुद्धा आवश्यक आहे. आपण कोणत्या क्षेत्रात किती प्रमाणात गुंतवणूक करावी याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच शेअर मार्केटचे व्यवहार कसे चालतात, त्यामध्ये कशा प्रकारे गुंतवणूक करता येऊ शकते. आणि गुंतवणूक केल्यानंतर त्याचे ग्राहकाला कोणकोणते फायदे मिळतात. म्युच्यूअल फंड म्हणजे काय, मार्केट आणि सेकंडरी मार्केट यामधील साम्य भेद अशा विविध विषयांवर त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ प्रा. आसावरी शेवाळे, प्रा. शशी कराळे उपस्थित होते.

या  कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्य डॉ. मंजुश्री बोबडे म्हणाले की, वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साक्षरतेबरोबरच वित्तीय साक्षरतेचे ज्ञान मिळावे यासाठी हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांना कॅपिटल मार्केट,  प्रायमरी मार्केट,  शेअर मार्केट अशा विविध विषयांचे ज्ञान मिळावे. तसेच त्या ज्ञानाचा स्वतःसाठी व समाजासाठी उपयोग व्हावा. म्हणून वित्तीय साक्षरतेचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
डॉ. सुभाष निंबाळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर प्रा. कुशल पाखले यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. या वाणिज्य  विभागातील शिक्षण घेणारे एकशे वीस विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.