Nigdi News : ‘आयआयसीएमआर’मध्ये ‘टाईम मॅनेजमेंट’वर मार्गदर्शनपर व्याख्यान 

एमपीसी न्यूज – औद्योगिक तंत्र शिक्षण संस्थेच्या इन्स्टिटयूट ऑफ इंडस्ट्रियल अँड कॉम्प्युटर मॅनॅजमेन्ट अँड रिसर्च, निगडी या संस्थेत डायरेक्टर-एमसीए डॉ. दीपाली सवाई यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वेळेचे व्यवस्थापन’(Time Management) याविषयावर विदयार्थी व शिक्षकांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 

टाईम मॅनेजमेंट प्रशिक्षिका कांचन दीक्षित यांनी याप्रसंगी ध्येय प्राप्तीसाठी योजना, व्हिजन बोर्डद्वारे कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना ध्येय कसे ठरवावे? त्यासाठी लागणारे नियोजन कसे करावे? चांगल्या सवयी कशा लावून घ्याव्यात याबद्दल समजावून सांगितले. एबीसिडी नियम वापरून ‘टु डू’ लिस्ट बनविणे, पार्किन्सनस लॉ, काईझॅन टेकनिक, पोमोडॉरो टेकनिक याविषयी माहिती दिली. तसेच एनर्जी मॅनेजमेंटसाठी मेडिटेशनचे महत्त्व पटवून दिले.

शंभरपेक्षा अधिक एमसीएच्या विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. शनिवारी ऑनलाइन पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघना मोकाशी यांनी केले.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.