BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : चिंचवडला सोमवारपासून जिजाऊ व्याख्यानमाला 

एमपीसी न्यूज –  चिंचवड येथील  गांधीपेठ तालीम मित्र मंडळाच्यावतीने जिजाऊ व्याख्यानमाला आयोजित केली आहे. या व्याख्यानमालेत सर्व वक्त्या महिला आहे. चिंचवड येथील हुतात्मा चापेकर स्मारक उद्यानात ही व्याख्यानमाला  सायंकाळी सात वाजता होणार आहे.

या व्याख्यानमालेत सोमवार दि. 6 मेला डॉ. सीमा निकम या ताण व्यवस्थापन, मंगळवार दि. 7 मेला तृप्ती धोडमिसे -नवत्रे या माझा स्पर्धा परीक्षेचा प्रवास, बुधवार दि. 8 मेला कॅप्टन स्मिता गायकवाड या शहरी नक्षलवादाचे आव्हान, गुरुवार दि. 9 मेला सविता व्होरा जागर  हा जाणिवांचा , शुक्रवार दि. 10मेला गुरुदासी विजयालक्ष्मी शिरगांवकर  या सती मंदोदरी या विषयावर व्याख्याने होणार आहे. तरी श्रोत्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गांधीपेठ तालीम मित्र मंडळाच्या वतीने केले आहे.

Advertisement