Chinchwad : बर्ड व्हॅली परिसरात एलईडी पथ दिवे

एमपीसी न्यूज – चिंचवड संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली परिसरात एलईडी पथदिवे बसविण्यात आले आहेत. प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग सुरु असून यासाठी अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे यांच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले. 
याबाबत माहिती देताना अनुराधा गोरखे म्हणाल्या, पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जात आहे. पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक दिवसेंदिवस वाहतूक वाढत आहे. रात्रीच्या वेळी वाहनांचा वेग जास्त असतो. त्यामुळे अपघात होतात. वाहतूक सुरळीत होण्यासाठी आवश्यक आहेत ते रस्ते. रस्ते ही कोणत्याही शहरातील मूलभूत सुविधा आहे.
रस्त्यांच्या विकासासाठी अशा स्मार्ट सिटी अंतर्गत एलईडीच्या पथदिव्यांचा वापर केला तर नक्कीच होणारे अपघात टळतील. या स्मार्ट सिटीमध्ये रस्त्याच्या वाहतुकीसाठी अडथळा ठरणा-या दुभाजक अंधारात दिसत नाही. दुभाजक न दिसल्यामुळे अनेक अपघात होत आहेत. पण या अपघाताला आळा घालण्यासाठी चिंचवड संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली येथील चौकात हे एलईडी पथदिवे बसविण्यात आले आहेत.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.