Pune : राफेल विमानांच्या खरेदीत कायदेशीर संसदीय प्रक्रिया टाळल्या गेल्या – जयपाल रेड्डी

एमपीसी न्यूज : राफेल विमानांच्या खरेदीत शंकास्पद असे बरेच काही आहे. खरेदीच्या आधी पंतप्रधान नरेंद मोदी व उद्योगपती अंबानी यांच्यात एक बैठक झाली. डील करताना सर्व कायदेशीर संसदीय प्रक्रिया टाळल्या गेल्या असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते, माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांनी केला. या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

काँग्रेस भवन येथे जयपाल रेड्डी आले होते. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, राफेल खरेदीआधीची ती गुप्त बैठक व त्यानंतर झालेले डील संशयास्पद आहे. फक्त बारा दिवस आधी एक कंपनी स्थापन होते व या खरेदी व्यवहारात सहभागी होते. विमानांची पूर्वी निश्चित केलेली किंमत काही पटींनी वाढते. 136 विमाने घ्यायची असताना 36 विमाने घेतली जातात. ज्यांना विमाने द्यायची आहेत ती कंपनी मध्यस्थीसाठी बारा दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या कंपनीचा आग्रह धरते. हे सगळेच शंकास्पद आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.