Maval : वडगाव येथे लवकरच सत्र न्यायालय सुरू करण्यासाठी अजितदादांना साकडे

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शुक्रवारी (दि. 6) भेट घेण्यात आली. वडगाव मावळ येथे सत्र न्यायालय कर्मचारी पगार व इतर आर्थिक तरतूद वित्त विभागाने तरतूद करावी व लवकरात लवकर वडगाव मावळ येथे सेशन कोर्ट सुरू करण्यात यावे, असे निवेदन देण्यात आले.

अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात सदर विषयाचा आवर्जून उल्लेख केला व विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव राजेश लढ्ढा व मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या बरोबर चर्चा करून सदर विषय लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

यावेळी संघटनेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अॅड सोमनाथ पवळे, अॅड धनंजय कोद्रे, अॅड दीपक चौधरी, अॅड सुधीर भोंगाडे, अॅड मुणाफ शेख, अॅड अभिषेक गोडांबे, अॅड मिलिंद ओव्हाळ, अॅड राम शहाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.