Leh: भारताच्या इंचभरही जमिनीला कोणी स्पर्श करू शकत नाही- राजनाथ सिंह

Leh: No one can touch even an inch of India's land - Rajnath Singh आतापर्यंतच्या चर्चेतून चीनशी असलेला वाद कितपत मार्गी लागेल याची हमी देता येत नाही, असे सूचक वक्तव्यही संरक्षणमंत्र्यांनी केले.

एमपीसी न्यूज : भारतातील एक इंच जागेवरही कोणीही कब्जा करू शकत नाही, असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज (शुक्रवार) लखाड येथे लष्करी जवानांशी बोलताना व्यक्त केला. 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह दोन दिवसांच्या दौऱ्यावर लडाखला गेले आहेत. यादरम्यान, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे हेसुद्धा त्यांच्यासमवेत आहेत. त्यांचा दोन दिवसीय दौरा एलएसी तसेच नियंत्रण रेषेत जाणार आहे. लडाखमध्ये भारतीय सैन्याला राजनाथ सिंह यांनी संबोधित केले. चीनशी असलेला वाद मिटण्याची आशा देखील त्यांनी व्यक्त केली.

भारत-चीनमधील सीमा वादावर सुरू असलेल्या चर्चेचा हवाला देत राजनाथ सिंह म्हणाले की, आतापर्यंत जी काही प्रगती झाली आहे, त्याद्वारे हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. हा प्रश्न कितपत मार्गी लागेल, याची हमी देता येत नाही, पण मला खात्रीपूर्वक सांगायचे आहे की, भारताच्या इंचभरही जमिनीला जगातील कोणतीही शक्तीला स्पर्श करू शकत नाही, कोणीही त्यावर ताब्यात घेऊ शकत नाही.

राजनाथ सिंह यांनी स्वतः ट्वीट करून या दौऱ्याची माहिती तसेच काही छायाचित्रे व व्हिडिओ शेअर केली आहेत. आज सकाळी लडाखला पोहोचल्यानंतर त्यांनी सीमावर्ती भागांचा दौरा केला आणि भारतीय सैन्य दलातील जवान व अधिकाऱ्यांची भेट घेताना लुकुंग चौकीलाही भेट दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.