BNR-HDR-TOP-Mobile

Pune : येत्या 5-6 दिवस शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा

एमपीसी न्यूज – खडकवासला धरणाच्या गेटच्या दुरुस्तीच्या कामामुळे येत्या 5 ते 6 दिवस पुणे शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागामार्फत देण्यात आली आहे. 

पुणे शहराला पाणीपुरवठा करणा-या खडकवासला धरणाच्या गेटची चाचणी व दुरुस्ती सुरु असल्याने, खडकवासला धरणाच्या पाण्याची पातळी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे बंद पाईपलाईनमधून पाणी कमी येत असून शहराला आवश्यक तो पाणीपुरवठा करणे अडचणीचे होत आहे. त्यामुळे या गेटची दुरुस्ती व चाचणी येत्या 5/6 दिवसांच्या कालावधीत पूर्ण होईपर्यंत शहरामध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागामार्फत देण्यात आली आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3