India Corona Update : 82 दिवसांनंतर साठ हजारांहून कमी रुग्णांची नोंद, दीड हजार मृत्यू 

एमपीसी न्यूज – भारतात मागील काही दिवसांपासून रुग्णवाढ साठ हजारांवर स्थिरावली होती. तब्बल 82 दिवसांनंतर देशात रुग्ण वाढ साठ हजारांच्या खाली आली आहे. मागील चोवीस तासांत देशभरात 58 हजार 419 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर, एक हजार 576 जणांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 कोटी 98 लाख 81 हजार 965 एवढी झाली आहे. त्यापैकी 2 कोटी 87 लाख 66 हजार 009 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 87 हजार 619 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

देशाचा रिकव्हरी रेट वाढून 96.27 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात सध्या 7 लाख 29 हजार 243 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील कोरोना मृतांची संख्या 3 लाख 86 हजार 713 एवढी झाली आहे. मागील 24 तासांत 1 हजार 576 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.28 टक्के एवढा झाला आहे.

देशात आजवर 39 कोटी 10 लाख 19 हजार 083 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 18 लाख 11 हजार 446 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 27 कोटी 66 लाख 93 हजार 572 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.