India Corona Update : चोवीस तासांत देशात तीस हजारांहून कमी कोरोना रुग्ण, 338 मृत्यू 

एमपीसी न्यूज – देशात मागील काही दिवसांपासून चाळीस हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची वाढ होत होती. गेल्या 24 तासांत तीस हजारांहून कमी रुग्णांची नोंद झाली आहे. चोवीस तासांत देशभरात 28 हजार 591 नवे रुग्ण वाढले असून, 338 मृत्यू झाले आहेत. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 32 लाख 36 हजार 921 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 24 लाख 09 हजार 345 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 34 हजार 848 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

देशात सध्या 3 लाख 84 हजार 921 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 338 रुग्ण दगावले आहेत, भारतात आजवर 4 लाख 42 हजार 655 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.33 टक्के एवढा झाला असून, देशाचा रिकव्हरी रेट वाढून 97.49 टक्के एवढा आहे.

आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 54 कोटी 18 लाख 05 हजार 829 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 15 लाख 30 हजार 125 नमूने तपासण्यात आले आहेत.

भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. आत्तापर्यंत देशात 73 कोटी 82 लाख 07 हजार 378 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 72 लाख 86 हजार 883 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.