India Corona Update : सलग दुसऱ्या दिवशी तीस हजारांहून कमी रुग्ण, 219 मृत्यू 

एमपीसी न्यूज – देशात सलग दुसऱ्या दिवशी तीस हजारांहून कमी रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 27 हजार 254 नवे कोरोना रुग्ण सापडले असून, रविवारी देशभरात 28 हजार 591 नवे रुग्ण आढळून आले होते. गेल्या 24 तासांत 219 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 32 लाख 64 हजार 175 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 24 लाख 47 हजार 032 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 37 हजार 687 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

देशात सध्या 3 लाख 74 हजार 269 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भारतात आजवर 4 लाख 42 हजार 874 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.33 टक्के एवढा झाला असून, देशाचा रिकव्हरी रेट वाढून 97.50 टक्के एवढा आहे.

आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 54 कोटी 30 लाख 14 हजार 076 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 12 लाख 08 हजार 247 नमूने तपासण्यात आले आहेत.

भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. आत्तापर्यंत देशात 74 कोटी 38 लाख 37 हजार 643 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 53 लाख 38 हजार 945 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.