Pune : उपेक्षित मुलांनाही दिवाळीचा आनंद मिळवून द्या – प्रा. रवी पिल्ले

एमपीसी न्यूज – दिवाळीसारखा सण साजरा करताना समजातील उपेक्षित मुलांमध्येही आनंद फुलविल्यास आपला आनंद खऱ्या अर्थाने द्विगुणीत होईल, असे मत फोरसाइट शैक्षणिक संस्थेचे सहव्यवस्थापक  प्रा. रवी पिल्ले यांनी व्यक्त केले. फोरसाइट शैक्षणिक संस्थेच्या वतीने सॅल्सबरी पार्क येथील सिल्व्हेशन आर्मी होप हाऊस येथे ४५ मुलांना दिवाळी फराळासाठी उपयुक्त सुका शिधा व शुभेच्छापत्र देण्यात आले.

आर्मी हाऊसचे मेजर सुहास वंजारे यांच्याकडे हा सुका शिधा देण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी फटाके उडविणार नाही, प्रदूषण करणार नाही, अशी शपथ घेतली. फोरसाइट शैक्षणिक संस्थेचे संचालिका निशा मेहता, अमिषा शाह, आशिष शाह, आदित्य बागुल, मिहीर शिर्के तसेच फोरसाइटचे विदयार्थी उपस्थित होते.

दिवाळीच्या आनंद समजातील उपेक्षित मुलांनाही सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. फोरसाइट शैक्षणिक संस्थेतर्फे गेल्या अकरा वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येतो, असे फोरसाइट शैक्षणिक संस्थेचे संचालिका निशा मेहता यांनी सांगितले.

समाजातील विविध उपेक्षित घटकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी अनेक संस्था व व्यक्ती काम करीत आहेत. मात्र, समाजातील संवेदना जागृत असलेल्या व्यक्ती आणि संस्था यांच्याकडून प्रोत्साहन आणि सहकार्याचा हात मिळणे आवश्यक आहे, असे आर्मी हाऊसचे मेजर सुहास वंजारे यांनी फोरसाइटच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा भोसले यांनी केले व आभार मानसी बनसोडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.