Ganesh Festival : मानाच्या गणपतीआधी आम्हाला विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊ द्या; दोन मंडळाची न्यायालयात याचिका

एमपीसी न्यूज – वर्षानुवर्षे सुरू असलेली परंपरा म्हणून मानाच्या गणपती मंडळाच्या मिरवणुकी आधी इतर गणेश मंडळांना विसर्जन मिरवणुकीत सहभागी होता येत नाही. त्यामुळे मानाचा गणपतीमुळे विसर्जन मिरवणुकीला उशीर होतो.त्यामुळे हा उशीर टाळण्यासाठी मानाच्या गणपती आधी पूर्व भागातील इतर गणेश मंडळांना लक्ष्मी रस्त्यावरून विसर्जन मिरवणुकीला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारी एक याचिका पुण्यातील दोन मंडळांनी उच्च न्यायालयात केली आहे.

पुण्यातील गणेशोत्सव हा वैभवशाली आहे.130 वर्षाची मोठी परंपरा या गणेशोत्सवाला आहे. विसर्जन मिरवणूक हे या गणेशोत्सवातील मोठे आकर्षण असते.महात्मा फुले मंडईतून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते.त्यानंतर लक्ष्मी रस्ता आणि डेक्कन जिमखान्यावरून मुठा नदीपात्रात श्रींच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते.दरवर्षी वीस ते पंचवीस तास हा सोहळा चालत असतो.मात्र याचा फटका मानाची गणपती सोडून इतर मंडळांना बसत असतो.

पुणे शहरात अनेक गणेश मंडळे अशी आहेत ज्यांनी आपली शंभर वर्ष पूर्ण केली आहेत.रविवार पेठेत 130 वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या बढाई समाज तरुण मंडळ आणि पांगुळ आळी गणेश मंडळ या दोन मंडळांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मानाच्या गणपती मंडळामुळे विसर्जन मिरवणूक लांबली जाते.विसर्जन मिरवणुकीच्या रांगेत 10 ते 12 तास थांबावे लागते.त्यामुळे वेळेत विसर्जन करता येत नाही.त्यामुळे लक्ष्मी रस्त्यावरून मानाच्या गणपती आधी विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करणारी याचिका या दोन्ही मंडळांनी उच्च न्यायालयात केली आहे.एडवोकेट असीम सरोदे यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे.त्यामुळे या याचा केवळ  न्यायालय काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.