सोमवार, फेब्रुवारी 6, 2023

Talegaon Dabhade : तर डाॅ बाबासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी 200 कोटी रुपये मिळवून देऊ – रामदास आठवले

एमपीसी न्युज-तळेगाव दाभाडे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान त्यांची स्मृती म्हणून जतन करावे. तसेच तळेगावमध्ये बाबासाहेबांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी 1 ते 2 एकर जागा प्राप्त झाली तर केंद्र व राज्य शासनाकडून १०० ते २०० कोटीचा निधी मिळवून देऊ, असे प्रतिपादन सामाजिक न्याय विभाग केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

तळेगाव येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानास सदिच्छा भेट देण्यासाठी आले असताना आठवले बोलत होते.

Talegaon Dabhade : विद्यार्थीभिमुख शिक्षण ही काळाची गरज- रामदास काकडे

यावेळी पश्चिम महाराष्ट्र आरपीआयचे अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष गणेश भेगडे,तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, पुणे जिल्हा आरपीआयचे संघटक अनिल भांगरे, युवक अध्यक्ष समीर जाधव, तालुका अध्यक्ष नारायण भालेराव, तळेगाव शहर अध्यक्ष संदीप शिंदे, महिला अध्यक्षा करुणा सरोदे,जनसेवा विकास आघाडीचे कार्याध्यक्ष कल्पेश भगत, माजी नगरसेवक समीर खांडगे, किसन थूल,सुनील पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी गणेश भेगडे, नारायण भालेराव यांनी या स्मृती स्थळास भरीव मदत करावी अशी मागणी केली. त्यावेळी नामदार आठवले म्हणाले तळेगावचे आणि माझे वेगळे नाते आहे हे स्मृती स्थळ असेच ठेऊन राष्ट्रीय स्मारक उभारणीसाठी तळेगावात जागा मिळावी. मी केंद्र व राज्य शासनाकडून 100 ते 200 कोटी निधी उपलब्ध करून देईन असे आश्वासित केले.

Latest news
Related news