Pune : प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांना खुश करण्यासाठी गोगावले यांचे निषेधाचे पत्र -खासदार संजय काकडे

एमपीसी न्यूज – पुणे शहर भाजप अध्यक्ष योगेश गोगावले यांच्याकडून खासदार संजय काकडे यांच्या विधानाच्या निषेधार्थ निषेधाचे पत्र मागील आठवड्यात काढण्यात आले होते. याबाबत संजय काकडे म्हणाले की, पुणे शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांनी भाजपच्या कोणत्याही खासदार, आमदार आणि नगरसेवकाशी त्यांनी चर्चा न करता माझ्या विरोधात निषेधाचे पत्रक काढले आहे. तसेच हे निषेधाचे पत्रक हे केवळ प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे याना खुश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अशी भूमिका मांडत त्यांनी गोगावले यांच्यावर निशाणा साधला.

आगामी निवडणुकीत युती न झाल्यास भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पराभव होईल आणि दोषी रेशन दुकानदारला पालकमंत्री गिरीश बापट यांनी परवाना दिला आहे. याप्रकरणी न्यायालया देखील बापट यांच्या कारभारवर ताशेरे ओढले आहेत. तर त्यांनी चौकशी होई पर्यंत मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप सहयोगी खासदार संजय काकडे यांनी विधान केले होते. हे दोन्ही विधानाला काही तास होत नाही तोवर भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांनी संजय काकडे यांना पक्षाची कार्यपद्धती माहीत नाही.

तसेच खासदार, आमदार आणि नगरसेवकानी निषेध केल्याचे पत्रक जाहीर केले. या सर्व पुणे शहरातील राजकीय घडामोडी घडत असताना वडगावशेरी येथे एका कार्यक्रमासाठी भाजप सहयोगी खासदार संजय काकडे हे आले होते. त्यावेळी भाजप शहर कार्यालयाकडून निषेधाचा पत्र काढण्यात आले.

याबाबत विचारले असता ते म्हणाले की, पुणे शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांनी भाजपच्या कोणत्याही खासदार, आमदार आणि नगरसेवकाशी त्यांनी चर्चा न करता माझ्या विरोधात निषेधाचे पत्रक काढले आहे. तसेच हे निषेधाचे पत्रक हे केवळ प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे याना खुश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अशी भूमिका मांडत त्यांनी गोगावले यांच्यावर निशाणा साधला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.