Nigdi News : ग्रंथालये ही ज्ञानाची सदावर्ते असून ग्रंथपाल मार्गदर्शक  आहेत – डॉ. न. म. जोशी

एमपीसी न्यूज – ग्रंथालये ही ज्ञानाची सदावर्ते असून ग्रंथपाल हा लेखक व वाचक यांचा मार्गदर्शक असतो.तसेच ग्रंथपाल हा वाचकांचा मित्र आणि तत्त्वज्ञ देखील असतो.या क्षेत्रात  ग्रंथपाल कै. वि. अ. जोशी यांनी फार मोठे कार्य केले आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी व्यक्त केले.

बाजीराव रस्त्यावरील नू. म. वि. शाळेचे ख्यातनाम ग्रंथपाल कै. वि. अ. जोशी यांच्या स्मृतिदिनी आणि त्यांच्याच जन्मशताब्दीच्या शुभारंभानिमित्त निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. कै. वि. अ.जोशी यांचे विद्यार्थी विवेक गोगटे, प्रसिध्द उद्योजक अनिल गानू, प्राचार्य मनोज देवळेक, शाळेचे ग्रंथपाल विप्रदास, प्रकाश जोशी, पर्यवेक्षक कुलकर्णी यांसह प्रशालेचा अध्यापक वर्ग आणि बहुसंख्य विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. कै. वि. अ. जोशी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वाचक चळवळ आणि ग्रंथ परिचय यासंबंधी अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाचे शिल्पकार कै. वा. ना. अभ्यंकर आणि कै. वि.अ.जोशी यांचे सुपुत्र प्रकाश जोशी यांनी नवनगर विद्यालयात ‘ग्रंथपाल कै. वि. अ. जोशी ग्रंथालय’ हे आदर्श ग्रंथालय उभारले आहे. या ग्रंथालयात एक प्रशस्त वाचन कक्ष आता तयार केला आहे. अनेक विद्यार्थी व वाचक त्याचा लाभ घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.