Life Style: शरीराचे संतुलन राखण्यासाठी घरच्या घरी बनवा Detox Water

Life Style: Make Detox Water at home to maintain body balance

एमपीसी न्यूज – सध्या घरी बसल्याबसल्या अनेकविध रेसिपीज करुन बघितल्या जात आहेत. तसेच चमचमीत, टेस्टी पदार्थ पण केले जात आहेत. त्यात लॉकडाऊनमध्ये घरात अडकून पडल्यामुळे मनासारखा व्यायाम करता येत नाही. त्यामुळे वजन वाढू लागले आहे. त्यात सध्या बाहेर तर उन्हाळा आहे. मग या स्पायसी खाण्यामुळे आणि उष्णतेमुळे शरीरात अशुद्ध द्रव्ये तयार होतात. त्यांना डिटॉक्स करणे अत्यंत गरजेचे आहे. मग जाणून घेऊया सोपे डिटॉक्स वॉटर घरच्या घरी कसे तयार करायचे ते…

आपल्याला चविष्ट खाणे आवडते. पण सारखे सारखे चमचमीत खाणे आपल्या पचनसंस्थेसाठी चांगले नसते. त्यामुळे पचन बिघडते. अशा वेळी डिटॉक्स वॉटरची गरज असते. तुमचा मेटाबॉलिजम रेट वाढवण्यासाठी सोपी डिटॉक्स वॉटर घरीच करुन पाहा आणि तरतरीत व्हा.

१) काकडी – लिंबू वॉटर – तुमच्या शरीराचे तापमान थंड ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. याची रेसिपी पुढीलप्रमाणे आहे.
साहित्य – एक लीटर पाणी, एक लिंबू, अर्धी काकडी, चार ते पाच पुदिन्याची पाने.

कृती – एक लीटर पाण्यामध्ये काकडीच्या चकत्या, लिंबाचे स्लाइस, पुदिन्याची पाने कुस्करुन घालणे. हे पाणी रात्रभर फ्रीजमध्ये ठेवणे. एकतर सकाळी पिणे किंवा दिवसभर यातील थोडेथोडे पाणी पिणे.

_MPC_DIR_MPU_II

काकडी व लिंबाच्या पाण्यातील अॅन्टीऑक्सिडन्टस शरीरातील अशुद्धी बाहेर काढण्यास मदत करते. तसेच डायबेटिस. हार्टचे आजार, कॅन्सर दूर ठेवण्यास मदत होते.

२) स्टॉबेरी – बेसिल वॉटर – हे पेय तजेला आणणारे आहे. हे चविष्ट पेय पचनक्रिया सुरळित करण्यात मदत करते. करण्याची पद्धत पुढीलप्रमाणे आहे.
साहित्य – एक लीटर पाणी, ८ फ्रेश स्टॉबेरीज, बेसिलची पाने, तीन लिंबाच्या चकत्या, अर्धा चमचा लिंबाचा रस, बेसिल न मिळाल्यास तुळशीची पाने चालतील.

हे सर्व पाण्यात मिक्स करुन रात्रभर फ्रीजमध्ये ठेवणे. सकाळी उठल्यावर पिणे किंवा दिवसभर थोडेथोडे पिणे.


३) साधे आले, लिंबाचे डिटॉक्स वॉटर – हा शरीराला डिटॉक्स करण्याचा सगळ्यात सोपा प्रकार आहे. त्याचबरोबर या औषधी गुणधर्म देखील आहेत.
साहित्य – पाऊण लीटर पाणी, पाच सहा लिंबाच्या चकत्या, अर्धा टीस्पून लिंबाचा रस, अर्धा टीस्पून आल्याचा रस, सहा सात आल्याच्या चकत्या.
हे सर्व पाण्यात मिसळून रात्रभर फ्रीजमध्ये ठेवणे. दुस-या दिवशी दिवसभर थोडेथोडे पिणे. यामुळे पचन तर सुधारतेच पण तुमचे आतडे स्वच्छ ठेवण्यास मदत होते. त्याचबरोबर सायट्रिक अॅसिड पचनासाठी उत्तम असते. त्यामुळे तुमची भूक प्रज्वलित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.