Life Style : Samsung ने 17 मेपर्यंत वाढवली ऑफरची मुदत; एसी, फ्रिज-टीव्हीवर ‘बंपर’ कॅशबॅक

Life Style: Samsung extends offer till May 17; ‘Bumper’ cashback on AC, fridge, TV

एमपीसी न्यूज – खूषखबर, खूषखबर, खूषखबर ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे सॅमसंग कंपनीने त्यांची  Stay Home, Stay Happy ही ऑफर 17 मे पर्यंत वाढवली आहे. लॉकडाउनमध्ये ज्यांना टीव्ही, फ्रिज, एसी, वॉशिंग मशिन किंवा अन्य उपकरण खरेदी करायचे असेल अशा ग्राहकांसाठी कंपनीने ही प्री-बुकिंग ऑफर गेल्या आठवड्यात आणली होती. ती आता 17 मेपर्यंत असणार आहे.

सॅमसंग कंपनीच्या  Stay Home, Stay Happy या ऑफरअंतर्गत आपल्या अनेक प्रॉडक्ट्सवर बंपर कॅशबॅक देत आहे. ऑफरची घोषणा केल्यापासून सर्वाधिक 75 टक्के मागणी महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा आणि गुजरात या राज्यांमधून असल्याचे कंपनीने नमूद केलंय.

त्यातही ग्राहकांची सर्वाधिक मागणी फ्रिजसाठी आहे. सर्वाधिक 37 टक्के बुकिंग फ्रिजसाठी तर टीव्हीसाठी 21 टक्के बुकिंग झाले आहे. त्यानंतर मायक्रोवेव्ह्ज,  एसी आणि वॉशिंग मशिनची मागणी असल्याचं कंपनीने सांगितलं. ही ऑफर आधी कंपनीने 8 मेपर्यंत ठेवली होती. पण आता ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने 17 मे पर्यंत ही ऑफर असेल. जाणून घेऊया ऑफर :-

17 मे पर्यंत सॅमसंगचे कोणतेही उपकरण बूक करणाऱ्या ग्राहकांसाठी कंपनीची ही ऑफर आहे. युजर सॅमसंगच्या ऑनलाइन इ-शॉपमधून (https://www.samsung.com/in/offer/online/ce-sale/) प्रोडक्ट्स प्री-बुक करु शकतात. बुक केलेल्या कोणत्याही प्रॉडक्टवर ग्राहकांना 15 टक्के कॅशबॅकची ऑफर दिली जात आहे. पण, ही ऑफर केवळ एचडीएफसीच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरच आहे. मात्र, याव्यतिरिक्तही कंपनीच्या अनेक ऑफर आहेत.

प्रॉडक्ट्सच्या खरेदीवर ग्राहकांच्या सोयीसाठी नो-कॉस्ट इएमआय, 18 महिन्यांपर्यंत लॉन्ग टर्म फायनान्सचा पर्यायही ठेवला आहे. सॅमसंग टीव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एक वर्ष अतिरिक्त वॉरंटी आणि 30 दिवस ZEE5 प्रीमियमची मोफत मेंबरशीप मिळेल. याशिवाय ओव्हन आणि अन्य प्रॉडक्ट्सवरही आकर्षक सूट आहे.

त्याबाबतची सविस्तर माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे. प्रशासनाकडून लॉकडाउनचे निर्बंध हटवल्यानंतर लगेच ग्राहकांना वस्तूंची डिलिव्हरी दिली जाईल असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1