Life threat to Gambhir : माजी क्रिकेटर व विद्यमान भाजप खासदार गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू व पूर्व दिल्ली मतदारसंघाचा खासदार गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ISIS काश्मीर या संस्थेकडून गौतम गंभीरला ईमेलवर धमकीचं पत्र मिळालं आहे. त्यानंतर गंभीर यांनी तात्काळ दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत तात्काळ वाढ करण्यात आली आहे.

गंभीरने तक्रार केल्याचा खुलासा पोलिसांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केलाय. ‘गौतम गंभीर यांना ISIS कश्मीर’ ने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. दिल्ली मध्यच्या पोलीस उपायुक्त डीसीपी श्वेता चौहान यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, ‘गौतम गंभीर यांना धमकी मिळाली आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. गौतम गंभीर यांच्या सुरक्षेत वाढ कऱण्यात आली आहे. त्यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे.’

गौतम गंभीरच्या कार्यालयामार्फत यासंदर्भात एक पत्र पोलिसांना पाठवण्यात आले आहे. ई-मेलवरुन आलेल्या धमकी पत्रात खसदार गौतम गंभीर आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय, असे म्हटले आहे. गौतम गंभीर हा भारता क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू असून, क्रिकेट मधून निवृत्ती नंतर त्याने राजकारणात प्रवेश केला. भाजपच्या तिकीटावर तो पूर्व दिल्ली मतदारसंघातून निवडून आला आहे. आपल्या बेधडक वक्तव्यासाठी तो नेहमीच चर्चेत असतो.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.