Lifetime Achievement Award : गुलाबबाई संगमनेरकर यांना विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Life Time Achievement Award: Vithabai Narayangaonkar Lifetime Achievement Award announced to Gulabbai Sangamnerkar तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलाकारास  राज्य शासनातर्फे तमाशा सम्राज्ञी विठाबाई  नारायणगावकर जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येते. 

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ तमाशा कलावंत गुलाबबाई संगमनेरकर यांना 2018-19 यावर्षासाठी तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही निवड केली आहे.

रुपये 5 लाख, मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलाकारास राज्य शासनातर्फे  तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येते.

राधाबाई बुधगावकर पार्टी मधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणार्या गुलाबबाईंनी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षापासून लावणी या कला प्रकारात स्वतःला झोकून दिले. बबुताई शिर्डीकर, सुगंधाबाई सिन्नरकर, महादू नगरकर यांच्याकडे शिक्षण घेता-घेता वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी स्वतःची संगीत पार्टी सुरू केली.

राज्यातील खेडोपाडी तसेच अनेक प्रतिष्ठित  महोत्सवांमध्ये त्याचबरोबर दूरदर्शन वरून  उत्तम कला  सादर करून त्यांनी  अमाप लोकप्रियता मिळवली. त्यांच्या अनेक ध्वनिमुद्रिका रसिकांनी डोक्यावर घेतल्या. “गाढवाचं लग्न” या अतिशय गाजलेल्या वगनाट्यातही त्यांचा सहभाग होता. शासनाच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल  गुलाबबाई  संगमनेरकर यांचे सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.