Lifestyle : लॉकडाऊनमध्ये ‘या’ पदार्थांचे सेवन करुन शरीर ठेवा तजेलदार

Lifestyle : Keep the body fresh by consuming these food in lockdown

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या या काळात घराबाहेर जाऊन चालण्याचा व्यायाम करता आला नाही तरी काही काळजी करु नका. आपल्या रोजच्या खाण्यात काही पथ्ये पाळली तरी तुम्ही सुदृढ व निरोगी राहू शकता. यासाठी काही खाद्यपदार्थांचे नियमित सेवन करा.

अक्रोड हा रक्तदाब नियंत्रित करते. अक्रोड एक उत्तम दर्जाचे खाद्य आहे. यापासून आपल्या शरीराला प्रोटीन तर मिळतात.  मूड ठीक करणे किंवा झोप लागत नसेल तर अक्रोड लाभदायक आहे. अक्रोडमध्ये असलेले फॅट नैराश्य कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. आठवड्यातून कमीत कमी तीनवेळा मधुमेह रुग्णांनी अक्रोडाचे सेवन करावे. त्यामुळे 30 टक्के मधुमेह कमी होऊ शकतो. अक्रोडमध्ये असणारे मोनो आणि पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट्स शरीरातील इन्सुलिनसाठी चांगले असते. अक्रोडातील अँटीऑक्सिडंट्स हृदय निरोगी आणि कार्यरत ठेवण्यास मदत करतात.

त्याचबरोबर आवळा हे एक बहुगुणी फळ आहे.  आवळ्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्यामुळे आवळा खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर आवश्यक पोषक तत्त्वे असतात. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात अ‍ॅन्टिऑक्सिडंट आणि अ‍ॅन्टिएजिंग गुणधर्म असतात. तसेच आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने वजन कमी करण्यासाठी मदत होते. अनेक संशोधनांमधून सिद्ध झाल्यानुसार, दररोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचं सेवन केल्याने वजन कमी करण्यास मदत होते. आवळा केस, त्वचा आणि पोटासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. जाणून घेऊया आवळ्याच्या आरोग्यदायी फायद्यांबाबत…

वजन कमी करण्याव्यतिरिक्त आवळा पोषक तत्त्व आणि अ‍ॅन्टिऑक्सिडंटने परिपूर्ण असतो, त्यामुळे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी ठरतो. आवळा ताप, घशातील खवखव किंवा समस्या, ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी, फुप्फुसांचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी आणि हृदयाचं आरोग्य सुधारण्यास मदत करतो, तसेच वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्यासाठीही आवळा मदत करतो. त्वचेसाठीही आवळा गुणकारी ठरतो. आवळा एक नैसर्गिक हेअर कंडिशनरच्या रूपातही काम करतो. आवळा फॅटी लिव्हर आणि कोलेस्टेरॉलशी लढून शरीराचं वजन कमी करण्यासाठी लाभदायक असतो.

पोटात होणाऱ्या समस्या जसे जळजळ, गॅस यासारख्या समस्याही दूर करतो. त्यामुळे दिवसातून दोन वेळा आवळ्याचा ज्यूस पिणं फायदेशीर ठरतं. आवळा डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठीही मदत करतो.

मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु झाला आहे. पावसाच्या येण्याची सगळे चातकासारखी वाट पाहात आहेत. मात्र सध्या उन्हाचा तडाखा खूप वाढत आहे. त्यामुळे आपल्या शरीराचे तापमानही वाढते.  अति उष्णतेमुळे शरीरातील पाणी कमी होते. उष्णतेत वाढ झाल्यामुळे शरीरातील व आतड्य़ातील स्निग्धता नष्ट होते. शरीरात पाण्याची गरज वाढते. अशा वेळी शरीराचे  तापमान कमी करण्यासाठी उन्हाळ्यात पुढील पदार्थांचे अवश्य सेवन करावे.

कोकम सरबत – दिवसभरात एखादा ग्लास कोकम सरबत घेतल्याने डिहायड्रेशन टाळता येते. शरीरातील पोषक तत्त्वांचा अभाव टाळतो येतो. याशिवाय भूकही वाढण्यास मदत होते व रक्ताचे शुद्धीकरणही होते.

ताक – उन्हाळ्यात ताकाच्या सेवनाने भूक टिकवून धरता येते. त्याचबरोबर शरीराला थंडावा मिळतो. यासाठी दही घुसळून त्यात भरपूर पाणी घातलेले पातळ ताक जेवताना अवश्य प्यावे.

नारळाचे पाणी- उन्हाळ्यात नारळाचे पाणी आरोग्यासाठी लाभदायक आहे. उष्मा आणि तीव्र उन्हामुळे शरीरातून घामाद्वारे अधिक पाणी बाहेर टाकले जाते. त्यामुळे नारळ पाणी पिणे उपयुक्त ठरते. नारळाच्या पाण्यात मीठ, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियमचे प्रमाण असते.

कलिंगड – कलिंगड उन्हाच्या काहिलीपासून गारवा देतेच तसेच याच्या दैनंदिन सेवनामुळे शरीरातील पाण्याचे संतुलन कायम राहते. कलिंगडात सुमारे 90 टक्के पाणी असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी पण हे उपयुक्त असते.

काकडी – शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काकडीचा चांगला उपयोग होऊ शकतो. काकडीत पाणी, कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरासाठी ती आरोग्यदायी असते.

पुदिना – औषधी गुण, पचन क्रिया सुरळीत करण्याचे गुणधर्म आणि शरीरासाठी थंड असल्यामुळे उन्हाळ्यात पुदिना शरीरासाठी लाभदायक ठरतो. पुदिना ही स्वस्त व सहजपणे मिळणारी वनस्पती असते. त्याची चटणी बनवून आपण खाऊ शकतो किंवा डीटॉक्स वॉटरमध्ये वापरु शकतो.

कांदे – कांद्यामध्ये थंडावा देणारे गुणधर्म आढळतात. कांद्याचा समावेश रस्सा, रायते, कोशिंबीर व चटणीमध्ये अवश्य करावा. ज्यामुळे शरीराला थंडावा मिळतो.

लिंबूपाणी – दिवसभरात एखादा ग्लास लिंबू सरबत घेतल्याने डिहायड्रेशन टाळता येते व शरीरातील पोषक तत्त्वांचा अभाव टाळता येतो. याशिवाय भूकही वाढण्यास मदत होते व रक्ताचे शुद्धीकरणही होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.