Talegaon : दुर्मिळ खापरखवल्या सर्पास वन्यजीव रक्षक संस्थेकडून जीवदान

एमपीसी न्यूज – दिवसेंदिवस मानवी हस्तक्षेपामुळे दुर्मिळ होत चाललेल्या खपरखवल्या या सर्पास वन्यजीव रक्षक संस्थेकडून जीवनदान मिळाले.

तळेगाव येथील रहिवासी संकेत बनसोडे यांनी वन्यजीव रक्षक संस्थेचे सदस्य नयन कदम, निनाद काकडे, मयुर दाभाडे व कुणाल खैरनार यांना संपर्क करून त्यांच्या अंगणात सर्प असल्याची माहिती दिली. त्यानंतर सर्व सदस्य तत्काळ घटनास्थळी पोहोचले व दुर्मिळ अशा खापरखवल्या सर्पास जीवदान दिले व निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त केले.

दिवसेंदिवस वृक्षतोड व निसर्गाच्या -हासामुळे हे सर्प कमी होत चालले आहे. त्यामुळे आपल्याला वृक्षलागवड करून पर्यावरणाचे जतन केले पाहिजे, अशी विनंती संस्थेच्या सदस्यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.