Pune : घरफोडीत 3 लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – राहत्या फ्लॅटचे कुलूप तोडून 3 लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना काल मंगळवारी (दि.9) दूपारी साडेअकरा ते चारच्या दरम्यान कोथरूड येथील मनोज व्हिला सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये घडली.

याप्रकरणी अंकुश आमकर(वय 50, रा. कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अंकुश आमकर हे आपल्या राहत्या फ्लॅटला कुलूप लावून गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते कुलूत तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला व बेडरूममधील कपाटातील सोन्या-चांदिचे दागिने व रोख रक्कम असा तब्बल 2 लाख 93 हजारांचा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी पुढील तपास कोथरूड पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.