Pune weather today : पुण्यात पुढील काही दिवस हलक्‍या स्वरूपाचा पाऊस

एमपीसी न्यूज : गेल्या काही दिवसांपासून पावसानी दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. अशात  गुरुवारी शहर परिसरात पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या. शहर परिसरात पुढील काही दिवस हलक्‍या स्वरूपात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यांनी खेचून आणलेल्या बाष्पामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. राज्याच्या दक्षिण भागावर पावसाचे ढग साचल्याने या भागात हलक्‍या ते मध्य स्वरूपात पाऊस पडला, तर पुढील48 तास विदर्भ आणि मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, अशी शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

दरम्यान, शहरात गेले अनेक दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने गुरुवारी दुपारी हजेरी लावली. अनेक ठिकाणी वाहतूक मंदावल्याचे, तर रस्ता निसरडा झाल्याने गाड्यांना किरकोळ अपघात झाल्याच्या काही घटनाही शहरात घडल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.