Lightning strike: बिहारमध्ये विजेचे भीषण तांडव; वीज कोसळून 83 जणांचा मृत्यू तर होरपळून शेकडो जखमी

Lightning strike: 83 killed, hundreds injured in lightning strike in Bihar गोपाळगंजमध्ये सर्वाधिक 13 जणांचा मृत्यू. त्याचवेळी मधुबनी-नवादामध्ये प्रत्येकी 8 जणांचा तर दरभंगा आणि बांका येथे प्रत्येकी पाचजणांनी जीव गमावले.

एमपीसी न्यूज –  आकाशातील वीज कोसळण्याच्या घटनांमुळे बिहारमध्ये मोठ्या प्रमाण जीवितहानी व वित्तहानी झाली आहे. राज्यात विविध ठिकाणी वीज कोसळल्याने 83 जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण होरपळून जखमी झाले.

एकूण 38 जिल्ह्यांपैकी 23 जिल्ह्यांमध्ये हे विजेचे भीषण तांडव अनुभवायला मिळाले. गोपाळगंजमध्ये सर्वाधिक 13 जणांचा मृत्यू. त्याचवेळी मधुबनी-नवादामध्ये प्रत्येकी आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. दरभंगा आणि बांका येथेही प्रत्येकी पाचजणांनी जीव गमावल्याची माहिती हाती आली आहे.

वीज दुर्घटनेतील जिल्हानिहाय मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. गोपाळगंज -13, पूर्व चंपारण -5, सीवान -6, दरभंगा -5, डॅंडी -5, भागलपूर -6, खगडिया-3, मधुबनी -8,  पश्चिम चंपारण -2, समस्तीपूर -1, शिवहर -1, किशनगंज -2, तक्ता 1, जहानाबाद -2, सीतामढी -1, जमुई -2, नवाडा -8, पूर्णिया -2, सुपौल -2, औरंगाबाद -3, बक्सर -2, मधेपुरा -1, कैमूर -2

हा विध्वंस झालेला असतानाच हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. बिहारसाठी 72 तासाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 72 तासांत बिहारमध्ये मुसळधार पावसासाठी हवामान खात्याने गुरुवारी सतर्कतेचा इशारा दिला.

दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीरसह उत्तर भारतातील अनेक राज्यांत मान्सूनने हजेरी लावली आहे. आजही वादळासह राजधानी दिल्लीत काही भागात पाऊस पडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.