Pune : सत्ताधाऱ्यांप्रमाणेच विरोधी पक्षनेते पदालाही मान – उल्हास पवार

एमपीसी न्यूज – सत्ताधाऱ्यांप्रमाणेच विरोधी पक्षनेते पदाला लोकशाहीत मान असून, त्याच्या शब्दाला महत्व असल्याचे मत माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केले. शिवाजी महाराज आदर्श राजा होते. त्यांच्या काळात स्त्रियांचा, माता – भगिनींचा सन्मान केला जायचा. आज शिवजयंतीच्या दिवशी सर्व सोसायटीचे लोक एकत्र येऊन दीपाली धुमाळ यांचा सत्कार  करतात, ही चांगली संकल्पना आहे.

वारजे हायवे परिसर विकास प्रतिष्ठान भव्य शिवजयंती सोहळा तसेच नगरसेविका दीपाली धुमाळ यांची पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार बुधवारी रात्री आयोजित करण्यात आला होता. व्हायोला चौक वारजे हायवे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

माजी आमदार उल्हास पवार, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, नगरसेविका लक्ष्मी दुधाने, पुणे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, साहित्य परिषदेचे कार्यवाह वि. दा. पिंगळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष निवृत्तीशेठ येणपुरे, कार्याध्यक्ष अनिल गायकवाड, विविध सोसायट्यांचे अध्यक्ष यावेळी उपस्थित होते.

दीपाली धुमाळ म्हणाल्या, मला मिळालेले विरोधी पक्षनेते पद हे वरजेकरांचा मान आहे. आगामी काळात सत्ताधाऱ्यांनी चुकीचे काम केले तर सहन करणार नाही. महापालिका आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून आम्ही काम करतो. नगरसेवक म्हणून मिरवीत नसल्याचे त्यांनी यावेळी निक्षून सांगितले. तसेच, बजेट असल्यावर अनेक विकासकामे करता येतात. वरिष्ठांनी टाकलेल्या संधीचे सोने करणार आहे.

बाबा धुमाळ म्हणाले, दरवर्षी प्रतिष्ठानतर्फे भव्य शिवजयंती आयोजित करतो. हा परिसर झपाट्याने वाढतो आहे. महापालिकेच्यावतीने अनेक योजना राबवितो. ज्येष्ठ नागरिक, महिलांना विविध संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. लवकरच सर्वसामान्य कुटुंबांना आरोग्याच्या सोयीसुविधा एमआरआय, सिटी स्कॅन, डायलिसिस बारटक्के रुग्णालयात उपलब्ध करून देत आहोत. या प्रतिष्ठानतर्फे नवनवीन उपक्रम राबवित असतो. तर, यावेळी वारजेला विरोधी पक्षनेते पद मिळाले, पुढील वेळी महापौर पद मिळावे, अशी अपेक्षा निवृत्तीशेठ येनपुरे यांनी व्यक्त केली.

HB_POST_END_FTR-A2
You might also like