Salisbury Park : ‘लिखे जो खत तुझे’ कार्यक्रम सॅलिसबरी पार्कच्या नवीन गार्डनसमोर यशस्वीरित्या संपन्न

एमपीसी न्यूज : “नागरिकांच्या पैशातून उभ्या राहिलेल्या व 40 वर्ष सिटीझन- प्रोटेस्ट करून, स्वखर्चाने सुप्रीम कोर्टात केस जिंकून जी वास्तू/जागा मिळवली त्याला कुठल्याहि व्यक्तीचे नाव देऊ नये, असे सॅलिसबरी पार्कच्या (Salisbury Park) रहिवाश्यांना वाटते. स्थानिक नागरिकांनी भीमाले यांच्यासोबत बैठक घेऊन सांगितले की, हा उद्यानाचा मुद्दा मागील ४० वर्षांपासून नागरिकांच्या जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे या उद्यानाला खाजगी व्यक्तीचे नाव द्यायचे नाही, त्यावर भिमाले यांनी उद्यानाला कुणाचेही नाव न देण्याबाबत नागरिकांना होकारही दर्शवला होता.

PDFA LEAGUE 2022 : डिएगो ज्युनियर्सचे अपराजित्व कायम, युपीएसएवर सहज विजय

पुण्याच्या कोणत्याही सार्वजनिक उद्यानाला (Salisbury Park) फक्त राष्ट्रीय नेते आणि दिग्गज पर्यावरणवाद्यांची नावे द्यावीत, असे स्पष्टपणे PMC च्या 27 जुलै 2000 च्या GR मध्ये नमूद केले आहे. तरीही माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी आधीचा मूळ फलक बदलून त्यांच्या वडिलांचे नाव नवीन गार्डनला देण्यात आले. ते कायदेशीर आहे, कि बेकायदेशीर?

सॅलिसबरी पार्कच्या रहिवाश्यांनी भिमाले यांनी लावलेला बेकायदेशीर व अनैतिक फलक उतरविण्यासाठी जे आंदोलन सुरु केले आहे; त्यात तुम्ही आमच्यासोबत आहात का? आणि ते उचित आहे असे तुम्हाला वाटते का ? कृपया आम्हाला कळवा; हो किंवा नाही. असा मजकूर लिहून उत्तरे २२ मे पर्यंत त्यांच्या [email protected] या ईमेल आयडीवर मागितली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.