Pimple Gurav : लिंगायत समाजाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार 

एमपीसी  न्यूज – पिंपळे गुरव येथील प्रतिष्ठानच्या वतीने लिंगायत समाजाच्या 1 ली ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मराठवाडा  जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार व मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवानंद तालिकोटी यांनी मन्मथ स्वामीच्या प्रतिमेचे पूजन करून दिप प्रजवलन केले

यावेळी अरुण पवार यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व प्रतिकुल परिस्थितीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रमुख पाहुणे श्रीकृष्ण सरताले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तालिकोटी यांनी असे सांगितले, आम्ही गेल्या 23 वर्षांपासून हा विद्यार्थी गुणगौरव सोहळा घेत आहोत. बसवेश्वर जयंती ,मन्मथ स्वामी जयंती ,यासारखे आम्ही धार्मिक उपक्रम ही राबवित असल्याचे सचिव दयानंद जेवळे यांनी सांगितले .यावेळी महादेव महाजन एस बी पाटील डॉ रूपा हिरेमठ इत्यादी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन यशवंत बालगावकर यांनी केले तर आभार जेवले यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.