Bhosari : लायन्स क्लब्ज् ऑफ पुणे भोजापूर गोल्डतर्फे आयोजित वक्तृत्व स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज- लायन्स क्लब्ज् ऑफ पुणे भोजापूर गोल्ड, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा भोसरी तसेच इंद्रायणी व्होकेशनल ज्युनिअर कॉलेज भोसरी या संस्थेच्या वतीने गांधी जयंती निमित्त 9 वी ते 12 वी या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .

_MPC_DIR_MPU_II

यामध्ये वाघेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी ज्ञानेश्वर उनवणे याने प्रथम क्रमांक मिळविला. इंद्रायणी ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी मनीषा सोनार हिने द्वितीय तर महात्मा फुले विद्यालय भोसरीचा विद्यार्थी प्रथमेश राहुल चव्हाण याने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. रोहिणी कांबळे चतुर्थ तर प्रतीक्षा सुरवडे हिला पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. गांधीजी चलनावर – मनावर कधी, मी व्यावसायिक होणार, मोबाईल शाप की वरदान आणि वसुंधरेची हाक- पर्यावरण संवर्धन हे विषय वक्तृत्वस्पर्धेसाठी ठेवण्यात आले होते.

स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून जगताप, के .के काळे मॅडम आणि अमोल नेहरे यांनी काम पाहिले. पारितोषिक वितरण समारंभासाठी लायन्स क्लबचे अध्यक्ष सुदाम भोरे, एम पी सी न्यूजचे अनिल कातळे इंद्रायणी कॉलेजचे प्राध्यापक शंकर देवरे .प्रा .दिगंबर ढोकले आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.