Vadgaon Maval  : लायन्स क्लब ऑफ वडगावचा ‘ऑक्टोबर सेवा सप्ताह’ विविध उपक्रमांद्वारे साजरा

एमपीसी न्यूज –  लायन्स क्लब ऑफ वडगाव यांच्या वतीने 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यान ‘ऑक्टोबर सेवा सप्ताह’ राबविण्यात आला. या सप्ताहात वृक्षारोपण, बाल आश्रमातील मुलांना खाऊ वाटप, टेम्पो चालकांची नेत्र तपासणी, वृद्धाश्रमात प्रोटीन पावडर आणि धान्य वाटप, एसटी महामंडळाच्या बसमध्ये प्रथमोपचार पेट्यांचे वाटप आदि सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

शनिवार दि. 2 ते शुक्रवार दि. 8 ऑक्टोबर 2021 या दरम्यान सर्वत्र साजरा होणाऱ्या ऑक्टोबर सेवा सप्ताहामध्ये प्रतिवर्षी प्रमाणे लायन्स क्लब ऑफ वडगांवच्या वतीने याहीवर्षी या सप्ताह दरम्यान विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
या सेवा सप्ताहामध्ये खालील उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती लायन्स क्लब ऑफ वडगांवचे अध्यक्ष दिलीप मुथा, प्रकल्प प्रमुख झुंबरलाल कर्णावट , नंदकिशोर गाडे, अ‍ॅड.चंद्रकांत रावल यांनी दिली.
*सामाजिक उपक्रम खालीलप्रमाणे*
सामाजिक कार्यकर्ते संदीप बाफना यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण मोहीम संपन्न करण्यात आली.
महिला सबलीकरण या विषयावर पुणे येथील ला.प्रा.प्रतिभा जगताप यांचे झोन चेअरपर्सन ला.प्रमिला वाळुंज यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला भगिनींसाठी विशेष व्याख्यानाचे श्री.महावीर भवन येथे आयोजन.
वडगांव मावळ येथील आशासेविका ताई यांचा विशेष सन्मान. वेकफिल्ड कंपनी, पुणे यांच्या सौजन्याने देवले ता. मावळ येथील बाल आश्रमातील सुमारे १२० बालकांना खाऊ वाटप. वडगांव मावळ येथील सुमारे ७५ रिक्षा, टेम्पो वाहन चालक बांधवांची मोफत नेत्र तपासणी आणि मोफत चष्मा वाटप. वडगांव मावळ येथील उडान फाऊंडेशन यांच्या ओल्ड एज होम येथे अ‍ॅड. नूतन लोणारी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रोटीन पावडर टिन्स आणि धान्य वाटप.
तळेगांव दाभाडे एस टी बस स्थानकामधील बसेस मध्ये आगार प्रमुख प्रमोद धायतोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मावळ तालुक्यातील एस टी बसेस मध्ये प्रथमोपचार पेट्यांचे वाटप.
*असे उपक्रम राबविण्यात आले.*
लायन्स क्लब ऑफ वडगांवचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. दामोदर भंडारी, खजिनदार संतोष चेट्टी,जितेंद्र रावल, गुलाबराव म्हाळसकर,  डॉ.नेमीचंद बाफना, अमोल मुथा, प्रदीप बाफना, एम जे एफ सुनीत कदम, बाळासाहेब बोरावके, संजय भंडारी,आनंद छाजेड, भूषण मुथा, आदिनाथ ढमाले, संजय गांधी, प्रशांत गुजराणी, योगेश भंडारी, महिला लायन सदस्य आदींनी नियोजन केले.
यापुढेही असेच सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील अशी माहिती लायन्स क्लब ऑफ वडगांवचे अध्यक्ष दिलीप मुथा यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.