Pune News : पुणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टीत दारूच्या पार्ट्या करतंय कोण? दारूच्या बाटल्यांचा खच आढळल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित

एमपीसी न्यूज – पुण्यातील घोले रस्त्यावरील महानगरपालिकेच्या मामाराव दाते मुद्रणालयाच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खच आढळल्याने येथील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. शिवाय, या ठिकाणी दारूच्या पार्ट्या होत असल्याचा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे येथील सुरक्षारक्षकच दारूच्या पार्ट्या करत असल्याचा आरोप आता करण्यात येत आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. मामाराव दाते मुद्रणालयात दारूची पार्टी करत असताना एक कर्मचारी या व्हिडिओ दिसून येत आहे. याचाच अर्थ तिथे सर्रासपणे दारूच्या पार्ट्या होत असल्याचे दिसून येत आहे. महापौर निवासस्थानापासून जवळच असणाऱ्या या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठांची भीती राहिली नाही की काय असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

पुणे महानगरपालिकेने जुलै महिन्यातच या दाते मुद्रणालयाचे दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या मुद्रणालयाच्या पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्याला किती लायब्ररी असं नावही देण्यात आले. परंतु आता त्या ठिकाणी अशाप्रकारे दारूच्या पार्ट्या होत असल्याने या जागेची चर्चा रंगली आहे. महानगर पालिका प्रशासन आता या मुजोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.