Liquor Revenue: लॉकडाऊनमध्ये दारू विक्रीत सरकारच्या तिजोरीत जमा झाले तब्बल 3900 कोटी

दारूवरच्या अबकारी शुल्कातून राज्याला दिवसाला जवळपास 50 कोटी आणि महिन्याला साधारणतः 1500 कोटी रुपये मिळतात.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यात लॉकडाऊन लागू केला. मात्र, राज्याला आर्थिक हातभार मिळावा यासाठी मे महिन्यांपासून मद्य विक्रीसाठी परवानगी देण्यात आली. त्यानंतर राज्यातील तळीरामांनी चार महिन्यात राज्याच्या तिजोरीत थोडे थोडके नव्हे तर 3900 कोटी रुपयांची भर टाकली आहे.

मद्यविक्रीतून राज्याच्या तिजोरीत भर पडेल असा युक्तीवाद वाइन शॉप उघडण्याची मागणी करणारे करीत होते. अखेर सरकारने 4 मे पासून राज्यात वाइन शॉप सुरु करण्यास परवानगी दिली. त्यानंतर वाइन शॉपसमोर लागलेल्या मोठमोठ्या रांगा आपण पाहिल्या आहेत. वाइन शॉप मालकांना मद्याची होम डिलिव्हरी देण्यासही सांगितले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 4 महिन्यांत राज्य सरकारला तब्बल 2362 कोटींचा महसूल मिळाला आहे. एकूण 3900 कोटींची मद्य विक्री झाली आहे. सरकारच्या तिजोरीत 682 कोटी देशी दारूपासून, 1568 कोटी विदेशी मद्यापासून आणि 111 कोटी बियर विक्रीतून कररुपाने जमा झाले आहेत.

दारूवरच्या अबकारी शुल्कातून राज्याला दिवसाला जवळपास 50 कोटी आणि महिन्याला साधारणतः 1500 कोटी रुपये मिळतात. एप्रिल ते जुलै 2020 या चार महिन्यात 3384 कोटी कररुपाने मिळाले होते.

राज्यात 15 हजार रेस्तराँ अँन्ड बार असून 1685 वाईन शॉप आहेत. 5 हजार बियर शॉप आणि 4045 देशी दारुची दुकाने आहेत. राज्य सरकारने आता फक्त वाइन शॉपलाच परवानगी दिलेली आहे. मद्यविक्रीची सर्व दुकाने सुरु झाल्यास सरकारला महिन्याला 1500 कोटींचे उत्पन्न मिळणे सुरु होईल.

राज्यात दरवर्षी 87 कोटी 75 लाख लिटर दारु तळीराम रिचवतात. यात 35 कोटी लिटर देशी, 21 कोटी लिटर विदेशी मद्य, 30 कोटी लिटर बियर आणि 75 लाख लिटर वाइनचा समावेश आहे. यात हातभट्टीच्या दारुचा समावेश नाही. कारण ती अनधिकृत असून सरकारला त्यापासून कसलाही कर मिळत नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.