PUNE : पुणे, पिंपरी-चिंचवडमधील परमिट रूम आजपासून 31 मार्चपर्यंत बंद : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

एमपीसी न्यूज : ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकरी यंत्रणांनी आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गर्दी टाळण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील  परमिट रूम (एफएल ३) हॉटेल, रेस्टोरंट, क्लब, कॅन्टीन येथे मिळणारी सौम्य दारू अथवा वाईन (फॉर्म ई) मिळणार नाही. वाईन बार (ई २), परमनंट, तात्पुरते क्लब (एफएल ४) 18 ते 31 मार्च या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. 

त्यातून तारांकित हॉटेल वगळण्यात आले आहेत.  आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.  मात्र,  वाईन शॉप सुरु राहतील. देशी दारू, बिअर शॉपी (फॉर्म एफ एल बी आर २) सुरु राहणार आहेत.

पुणे जिल्हयामध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून अनेक प्रवासी भारतात येऊन ते विविध शहरांमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे कोरोनोचा संसर्ग वाढू नये तसेच त्याला तात्काळ प्रतिबंध व्हावा यासाठी शासकीय पातळीवर ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत.

त्याअनुषंगाने नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तरीही काही ठिकाणी गर्दी  दिसून येत आहे. ती प्रामुख्याने दारू दुकानांमध्ये. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरात अनेक दारू दुकाने आहेत. या दुकानांमध्ये मद्यपींची गर्दी असते.

ती टाळण्यासाठी १८ ते 31 मार्च या कालावधीत या दोन्ही शहरातील सर्व परमिट रूम (एफएल ३) बंद राहणार आहेत. त्यातून तारांकित हॉटेल वगळण्यात आले आहेत. हॉटेल, रेस्टोरंट, क्लब, कॅन्टीन येथे मिळणारी सौम्य दारू अथवा वाईन (फॉर्म ई) मिळणार नाही. वाईन बार (ई २), परमनंट, तात्पुरते क्लब (एफएल ४) बंद   ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.

त्याचबरोबर या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई कारण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. मात्र,  वाईन शॉप सुरु राहतील. देशी दारू, बिअर शॉपी (फॉर्म एफ एल बी आर २) सुरु राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.