Bhosari : दारूचे दुकान फोडून 73 हजारांची दारू चोरीला

Liquor worth Rs. 73,000 stolen from wine shop.

एमपीसी न्यूज – दारूचे दुकान फोडून चोरट्यांनी दारूच्या दुकानातील सुमारे 73 हजारांच्या दारूच्या बाटल्या चोरून नेल्या. ही घटना बुधवारी (दि. 20) सकाळी दापोडी येथे उघडकीस आली.

मनोज शंकरलाल परदेशी (वय 45, रा. नेहरू चौक, दापोडी) यांनी बुधवारी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी परदेशी यांचे दापोडीमध्ये राजा वाइन्स नावाने दारूचे दुकान आहे. मंगळवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास त्यांनी आपले दुकान बंद करून घरी गेले. बुधवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास त्यांना दुकानात चोरी झाल्याचे दिसून आले.

चोरट्यांनी दुकानाच्या भिंतींमधील जाळी कशाच्या तरी सहाय्याने तोडून आत प्रवेश केला.

दुकानातील 72 हजार  857 रुपये किमतीच्या विविध विदेशी ब्रँडच्या दारूच्या 48 बाटल्या चोरून नेल्या. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.