Pune : कोथरूडमध्ये शनिवारपासून रंगणार साहित्यिक कलावंत संमेलन

एमपीसी न्यूज – साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान पुणे, आयोजित १९ वे साहित्यिक कलावंत संमेलन २८ व २९ डिसेंबर रोजी कोथरूडमध्ये रंगणार आहे. त्याचे उद्घाटन अर्थमंत्री जयंतराव पाटील‌‌ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात विविध साहित्यिक कार्यक्रम आयोजित केले आहे. त्याची कोथरूडकरांना पर्वणीच ठरणार आहे. साहित्य प्रेमी नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी केले आहे.

या संमेलनाचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध लेखक आणि संत साहित्य आणि लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे भूषविणार आहेत. या संमेलनानिमित्त प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले आणि प्रसिद्ध अभिनेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना वाग्यज्ञे साहित्य व कला गौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.