Pune : पाण्याच्या टाकीत पडून चिमुकल्याचा मृत्यू

ठेकेदारावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पाण्याच्या टाकीत पडून एका मजुराच्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना कात्रज येथे 7 मे रोजी घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक सुबराव लाड यांनी फिर्याद दिली. त्याप्रमाणे ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वराज माधव खवले (वय 11, रा. भिलारेवाडी, कात्रज) असे मयत चिमुकल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज येथे वाघजाईनगर मंदिराजवळ भिलारेवाडी येथे बिल्डिंगचे बांधकाम सुरू होते. या ठिकाणी पार्किंगच्या जागेत पाण्याची टाकी होती. मात्र, ही टाकी कुलूप लावून बंद करण्यात आलेली नव्हती. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही काळजी घेण्यात आली नव्हती. मजूर खवले यांचा मुलगा मित्रांसोबत खेळत असताना पाण्याच्या टाकीत पडला. त्यात त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी ठेकेदारावर हलगर्जीपणा, निष्काळजीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक लाड पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.