Lonavala : उद्धव ठाकरे यांच्या शपथ विधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण

एमपीसी न्यूज – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्याचे लोणावळा चौकात थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.

उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हा महाराष्ट्राकरिता अभूतपूर्व सोहळा असल्याने या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करत तो नागरिकांना दाखविण्यात आला. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, स्वाभिमानी रिपाई या पक्षांच्या वतीने संयुक्तपणे हा सोहळा स्क्रिनवर दाखविण्यात आला. सर्व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिकांनी यावेळी सर्व राष्ट्र पुरुषांना पुष्पहार अर्पण करत जल्लोष केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.