Bhosari : ‘राहतात एकीकडे, आणि नाव आले दुसरीकडे’

एमपीसी न्यूज –  भोसरी येथील महात्मा फुले जागृती मंडळ शाळेच्या मतदान केंद्रात थरमॅक्स चौक येथे राहणाऱ्या  १३ महिलांनी मतदान केले. ‘राहतात एकीकडे, आणि नाव आले दुसरीकडे ‘ असा काहीसा प्रकार या महिलांसोबत घडला. याबाबत त्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. सर्व महिलांनी निवडणूक आयोगाच्या ढिसाळ नियोजनाबाबत नाराजी व्यक्त केली.

मनीषा लांडगे आणि त्यांच्या सहकारी थरमॅक्स चौक येथे मागील अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. त्यांचे नाव जवळील मतदान केंद्रातील मतदार यादीत असायला हवे परंतु त्यांचे नाव हे भोसरीतील महात्मा फुले जागृती मंडळ शाळेच्या मतदार यादीत आहे. यामुळे त्यांना आपला लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी प्रवास करावा लागतो आहे. यामध्ये काही वृद्ध महिला असल्यामुळे त्यांना नाहक त्रास होत आहे असे मनीषा लांडगे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.