Talegaon : भारतीय कासवाला वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून जीवदान

एमपीसी न्यूज – माळवाडी परिसरात रस्त्यावर बसलेल्या एका कासवाला वन्यजीव रक्षक या संस्थेकडून जीवदान देण्यात आले. 

तळेगाव येथील माळवाडी परिसरातील रहिवासी योगेश येवले यांनी एक कासव रोडवर येऊन बसले आहे, अशी माहिती नयन कदम यांना दिली.
माहिती मिळताच मावळच्या वन्यजीव रक्षक संस्थेचे नयन कदम, निनाद काकडे, मयुर दाभाडे हे घटना स्थळी पोहचले व त्या कासवाला सुखरूप बाजूला काढले व इंद्रायणी नदी येथे सोडून जीवदान दिले.

हे कासव सुमारे 1 फूट व्यासाचे indian flapshell turtel असल्याचे नयन कदम व निनाद काकडे यांनी सांगितले. विणीचा हंगाम सुरू असल्यामुळे हे कासव अंडी घालण्यासाठी पाण्यातून बाहेर आले असावे, अशी शक्यता वर्तवण्यात आली. परिसरातील काही आदिवासी समाज या कासवांची अवैधरित्या विक्री करतात त्यांची शिकार करतात व पाठीवरील कवचाचा व्यापार केला जातो. हे कासव दुर्मिळ होत चालले आहे. त्यामुळे या गोष्टीवर वनविभागाने लक्ष द्यावे, असे प्राणी प्रेमींनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.