Loan App Scam : देशातील सर्वात मोठा लोन अॅप घोटाळ्याचा पर्दाफाश, 18 अटकेत, पुणे पोलिसांची मोठी कारवाई

एमपीसी न्यूज : लोन ॲप द्वारे सर्वसामान्य (Loan App Scam) नागरिकांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांच्या सायबर पथकाने पर्दाफाश केला आहे. सायबर पोलिसांनी फ्रॉड लोन ॲपचे कॉल सेंटर उध्वस्त केलं आहे. याप्रकरणी 18 आरोपींना अटक करण्यात आली आहे. याद्वारे आतापर्यंत हजारो नागरिकांची फसवणूक झाली असून कोट्यावधी रुपयांना गंडा घातला आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन लोन एप्लीकेशन वरून तत्काळ कर्ज देण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक केली जात होती. यातील काही लोन अॅप्लीकेशन्स द्वारे युजरला किमान 500/- रुपया पासून ते कमाल 7000/- रुपयापर्यंतचे तात्काळ कर्ज दिले जाते. अशा या लोन अॅप्लीकेशन्स युजरच्या हॅन्डसेटमध्ये डाऊनलोड करुन ते चालू झाल्यानंतर युजरच्या हॅन्डसेटचा Camera, Contacts, Location, Sms, Storage, Microphone, gallary या परमिशन Allow करण्याचा मेसेज मोबाईलच्या होम स्क्रिनवर प्राप्त होतो.

या सर्व परवानगी युजरने दिल्यानंतर युजरच्या हॅन्डसेटमधील सर्व डेटाचा अॅक्सेस लोन अॅप्लीकेशन पुरविणा-या कंपनीस जातो. आणि सर्व डेटाचा अॅक्सेस मिळाल्यानंतर तो सर्व डेटा कंपनी क्लोन करुन त्याच्या सर्व्हरवर साठवून ठेवते. आणि मग कर्जाची रक्कम प्रोसेसिंग फी वजा करुन युजरचे अकाऊंटमध्ये डिपॉझिट झाल्यानंतर 7 दिवसाचे आत त्यावर 30 ते 300 टक्क्यापर्यंत अधिकचे व्याज आकारुन त्याची परतफेड करण्यास सांगतात. आणि युजरने जरी कर्जाची रक्कम व त्यावरील आकारलेली मुद्दल व व्याजाची रक्कम भरुन देखील कंपनीने नेमलेल्या कॉलरकडून युजरला पुन्हा पैसे भरण्यासाठी कॉल येण्यास सुरुवात होते.

Borghat news: रात्री झालेल्या अपघातामुळे आज पहाटे 2 तास मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक वळवली

या कॉलवर सक्तीने पैसे भरण्यासाठी मानसिक त्रास दिला जातो. तसेच पैसे (Loan App Scam) भरण्यास उशीर झाल्यास लोन अॅप्लीकेशन कंपनी द्वारे युजरच्या माहितीचा (फोटो, कॉन्टेक्ट नंबर इत्यादी) गैरवापर करून कर्जफेड करणाऱ्याला मानसिक छळ केला जातो. यामध्ये लोन ऍप वापरकर्त्यांचे वैयक्तीक फोटो घेवून व त्याचे मॉफींग (अर्धनग्न / नग्न स्वरुपाचे मॉर्फिग) करून वापरकर्त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांना कॉल करुन धमकी, शिवगाळ करुन तसेच टेक्स्ट मॅसेजस, व्हॉटसअॅप मॅसेजेस पाठवुन, लोन अॅप वापरकर्त्यांची बदनामी केली जाते. व त्यांच्या कडून बदनामी न करण्यासाठी वारंवार खंडणी मागुन मोत्या प्रमाणात पैसे घेण्याचे काम केले जाते. या बदनामीची भीतीपोटी लोन अँप वापरकर्ता हा सदर लोन अॅप कंपनीने सांगितलेल्या बँक अकाऊंटवर / VPA ID / UPI ID यावर ऑनलाईन पैसे पाठवितात.

अश्या प्रकारचा सायबर गुन्हा संपुर्ण भारतामध्ये होत असून एकट्या पुणे शहरात सन 2020 ते 2022 (30 ऑगस्टपर्यंत) सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे 4778 एवढया मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झालेल्या आहेत. आणि या प्रकरणाची वरीष्ठ स्तरावर गांभीर्याने दखल घेवून त्याचा सविस्तर तपास करण्याच्या दृष्टीने सायबर पोलीस स्टेशन कडे ऑनलाईन लोन अॅप्लीकेशन फसवणुकी संदर्भात गु.र.नं. 21/2022 भा.द.वि. कलम 384, 385,386, 420, 469, 500, 501, 504, 506, 120 (ब), 34 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 43 (अ)/ 66.66 (डी). 67 प्रमाणे व गु.र.नं. 32/2022 भा.दं.वि. कलम 384, 385 386, 420, 469, 500, 501, 504, 506, 120B, 34 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 43 (a)/66, 43 (6) /66, 66(D), 67 प्रमाणे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.आणि त्याचा तपास सुरू होता. असे अमिताभ गुप्ता म्हणाले.

माहितीच्या तांत्रिक विश्लेषणातून पुढे आलेल्या माहितीच्या आधारे (Loan App Scam) आरोपी निष्पन्न करून सायबर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने 1. स्वप्नील हनुमंत नागटिळक, वय – 29 वर्षे, सध्या रा. पापाराम नगर, विजापुर रोड, सोलापुर, मुळ राहणार – वसाहत नं- 2, चाँद तारा मस्जिद समोर, विजापुर सोलापुर. 2. श्रीकृष्ण भिमण्णा गायकवाड, वय – 26 वर्ष, रा. फ्लॅट नं 401, शिवशक्ती चौक, त्रिवेणीनगर, भेकराई नगर, फुरसुंगी, हडपसर, पुणे 3. धिरज भारत पुणेकर वय 36 वर्षे, रा. संजय नगर, कुमले नका, घर नंबर 74. सोलापुर. 4. प्रमोद जेम्स रणसिंग, जय 43 वर्षे, रा. प्रियदर्शनी सोसायटी प्लॅट नंबर 4. समतानगर कुमठे नाका, सोलापुर. 5. सॅम्यु मुमताज सॅम्युअल संपत कुमार, वय 40 वर्ष, रा. 404 एम. को. आर सुर्वे अपार्टमेंट डिकोना रोड, बेलातुर, बेंगलुरू 6. मुजीब कंदीयल पिता इब्राहिम वय • 42, रा. बरोबियल हाउस अरूर पोस्ट. पूरामेरी कोझीकोडे अरूर केरळ – 673507 7. मोहम्मद मनियत पिता मोहिदू वय 32, रा. मनियत हाउस ता. पडघरा जि. कनिकत केरळ अश्या 7 आरोपींना सुरवातीला अटक करण्यात आली आणि त्यांना 10 दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे. या आरोपीने पुणे शहर, सोलपुर शहर, लातूर, जळगाव, बेंगलोर या ठिकाणांहून मजूर लोकांच्या नावे बँक खाते आणि विविध सिम कार्ड कंपनीला पुरवत होते.या आरोपीकडून

मोबाईल हॅन्डसेट सीमकार्ड सह 48, बँक अकाऊंट 56, सीम कार्ड संगणक 1, लॅपटॉप 1, चेकबुक/पासबुक – 27. एअरटेल के आय कंपनीचे मोकळे सीम कार्ड 30. बीट/क्रेडिट कार्ड – 167, पेटीएम स्वाईप मशीन 1, पॅनकार्ड 15, आधारकार्ड 04. 11, मतदार कार्ड 04, शिक्के अस मुद्देमाल हस्तगत करण्यात आलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.