Dehuroad News : शेलारवाडीतील रस्त्याची श्रमदानातून दुरुस्ती

एमपीसी न्यूज – बेगडेवाडी रेल्वे स्टेशन ते शेलारवाडी गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली होती. देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांनी स्व:खर्चातून तसेच स्थानिक तरुणांच्या श्रमदानातून या रस्त्याची दुरुस्ती केली आहे.

बेगडेवाडी रेल्वे स्टेशन ते शेलारवाडी गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहन चालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत होती. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून वारंवार करण्यात येत होती. अखेर या मागणीची दखल घेत देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांनी स्वतः खर्चातून रस्त्यावर काँक्रिटच्या मोऱ्या टाकून रस्ता दुरुस्त केला.

रस्ता दुरुस्तीसाठी युवा उद्योजक अमित भेगडे, योगेश शेलार, संदेश भेगडे, अतुल शेलार, किसन भेगडे, भरत भेगडे, बाळासाहेब शिळवणे, आनंद द. शेलार, नितीन जाधव, बाळासाहेब शेलार, गणेश तोंडे, दत्तात्रय न. शेलार, प्रफुल्ल शेलार, सोमनाथ शेलार, नंदकुमार शेलार, बाळासाहेब जाधव, प्रताप पवळे, दिलीप राठोड आदींनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.