Pune Crime News : कोथरुडमधील सराईत गुन्हेगाराला केले स्थानबध्द

एमपीसी न्यूज – कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरविणारा अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी  (Pune Crime News) स्थानबध्द केले आहे.एम.पी.डी.ए. कायद्यान्वये ही स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली.

 

ऋषीकेश ऊर्फ शुभम मधुकर वाघमारे (वय २४, रा. गुजरात कॉलनी, कोथरूड) असे स्थानबध्द केलेल्या सराईत गुन्हेगाराचे (Pune Crime News)  नाव आहे.शुभम याने त्याच्या साथीदारासह कोथरुड व विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोखंडी कोयता, चाकू, लोखंडी रॉड, बांबू, स्टंम्प यासारख्या जीवघेण्या हत्यारांसह घातक शस्त्राने गंभीर दुखापत, दुखापतीसह दंगा, वाहनांची जाळपोळ,दंगा यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत.

Sidhu Moosewala Murder Case : मूसेवाला हत्या प्रकरणात मला फसवलं जातंय – संतोष जाधव

 

गेल्या पाच वर्षात त्याच्याविरुध्द पाच गुन्हे दाखल आहेत.त्याच्या गंभीर कृत्यामुळे कोथरुड परिसरातील सार्वजनिक सुव्यव्स्थेस बाधा निर्माण झाली होती.तसेच त्याच्यामुळे जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे त्याच्याविरुध्द तक्रार करीत नव्हते. त्यामुळे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याबाबतच्या प्रस्तावाची व कागदपत्रांची तपासणी करुन शुभम वाघमारे याला एमपीडीए कायद्याखाली औरंगाबाद येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्याची कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.