Rahatni News : कोकणे चौकातील कराची बिर्याणी हाऊसला ‘टाळे’

एमपीसी न्यूज – कोरोनाचे निर्बंध झुगारून दारू विक्री केल्या प्रकरणी कोकणे चौक, राहटणी येथील कराची बिर्याणी हाऊस सील करण्यात आले. वाकड पोलिसांच्या अहवालानंतर महापालिकेने मंगळवारी (दि. 27) ही कारवाई केली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकणे चौक येथील कराची बिर्याणी हाऊस येथे कोरोनाचे निर्बंध झुगारून विनापरवाना दारू विक्री केली जात होती. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्यास पोषक वातावरण तयार झाले होते. यासंबंधी वाकड पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हे बिर्याणी हाऊस बंद करण्याबाबत वाकड पोलिसांनी महापालिकेला अहवाल दिला. त्यानंतर वाकड पोलिसांच्या अहवालानुसार मंगळवारी महापालिकेच्या पथकाने हॉटेल सील केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.