Lockdown Easing : Pimpri: लॉकडाउनमध्ये उद्यापासून शिथिलता; फक्त रविवारी दुकाने दिवसभर सुरु राहणार

Relaxation from tomorrow in lockdown; Only Sunday shops will be open throughout the day

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात लागू असलेल्या लॉकडाउनमध्ये उद्यापासून शिथिलता येणार आहे. शहरातील किराना दुकाने, मटन, चिकन, अंडी, मासे विक्रीची दुकाने रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत दिवसभर खुली राहणार आहेत. त्यानंतर गुरुवार (दि. 23) पर्यंत सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत खुली राहणार आहेत. याबाबतचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (शनिवारी) काढला आहे.

शहरातील वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी, कोरोनाची साखळी तोडण्याकरिता सोमवारी (दि.13) मध्यरात्रीपासून दहा दिवस म्हणजेच 23 जुलैपर्यंत शहरात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.

पहिले पाच दिवस अत्यावश्यक सेवेसह सर्वच बंद ठेवण्यात आले. त्यानंतर थोडीशी शिथिलता देण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले होते. त्यानुसार उद्यापासून शिथिलता असणार आहे.

अत्याश्यक वस्तुंचा पुरवठा करणारे दुकाने व त्यांचे ठोक विक्रेते यांची दुकाने उद्यापासून 23 जुलै पर्यंत सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. इतर सर्व अस्थापना बंद राहतील.

शेतकरी आठवडा बाजार, भाजी व फळांची विक्री करणारे अधिकृत फेरीवाले यांच्यामार्फत करण्यात येणारी विक्री, याशिवाय मटन, चिकन, अंडी, मासे विक्रीची दुकाने सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत चालू राहणार आहेत.

लॉकडाउन शिथील होताना दुकानांमध्ये, बाजारपेठेत होणा-या संभाव्य गर्दीचा विचार करता, कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी उद्या रविवारी फक्त दिवसभर सगळी दुकाने उघडी राहणार आहेत. सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत खुली असतील. तर, 20 ते 23 जुलैपर्यंत सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत चालू राहणार आहेत.

उद्यापासून काय सुरु राहणार? 

  • सर्व किराणा दुकाने, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते ( फक्त अत्यावश्यक वस्तू) यांची दुकाने 19 ते 23 जुलै या कालावधीत सकाळी 8 ते दुपारी 12 वा. पर्यंत सुरू राहतील.
  • मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादीची विक्री सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत चालू राहील.
  • ई-कॉमर्स सेवा उदा. अमॅझॉन, फ्लिपकार्ट व तत्सम सेवा उद्यापासून चालू होतील. यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचे, औषधे व तयार अन्नपदार्थांचे घरपोच वाटप सकाळी 8 ते रात्री 10 या कालावधीतच मनपाच्या पूर्वमान्यतेने पास घेऊन सुरू राहील.
  • शेतकरी आठवडी बाजार तसेच भाजी व फळांची विक्री करणारे अधिकृत फेरीवाले यांच्यामार्फत  करण्यात येणारी विक्री सकाळी सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत चालू राहतील.
  • पेट्रोलपंप व गॅस पंप सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत सुरु राहतील व ते केवळ शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवेतील पुरवठा साखळीतील वाहने तसेच पासधारक वाहनांना इंधन पुरवठा.

या गोष्टी 23 जुलैपर्यंत बंदच राहतील 

  • झोमॅटो, स्वीगी व तत्सम ऑनलाईन पोर्टलवरुन मागविले जाणारे खाद्यपदार्थ.
  • केश कर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर इत्यादी आस्थापना व सेवा संपूर्ण बंद राहतील.
  • खाजगी कार्यालये/आस्थापना संपूर्णतः बंद राहतील.
  • उपहारगृह, लॉज, हॉटेल
  • सार्वजनिक ठिकाणी/ ररत्यावर मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक, जॉगिंग, शारीरिक व्यायाम करण्यास मनाई राहील.
  • मद्य विक्री बंद राहील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.