Lockdown extended : राज्यात ३१ डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला

 एमपीसी न्युज : दिवाळीनंतर राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता घेता राज्य सरकारने (Maharashtra Government) राज्यातील लॉकडाऊन ३१ डिसेंबर २०२०च्या मध्यरात्रीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे सध्या असलेले कंटेन्मेंट झोनमधील निर्बंध हे कायम असणार आहेत. मात्र, असे असले तरी, यापूर्वी राज्य सरकारने ‘मिशन बिगिन अगेन'(Mission begin again) अंतर्गत ज्या गोष्टी, व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली आहे त्या सर्व गोष्टी, व्यवहार सुरू राहणार आहेत.

दिवाळीनंतर देशभरातील अनेक राज्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. त्यासोबतच राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कायम आहे.

हा प्रादुर्भाव आणखी वाढू नये यासाठी राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी चार राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट करणे अनिवार्य केलं.

दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा या राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी झाल्यावर राज्य सरकारने ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत आतापर्यंत अनेक व्यवहार, व्यापारांना परवानगी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.