Vadgaon : प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशानंतर वडगावात लॉकडाऊनला प्रारंभ

Lockdown started in Wadgaon following the order of the Province Officer :14 ते 23 जुलै या कालावधीत संपूर्ण वडगाव शहर प्रतिबंधित झोन

एमपीसी न्यूज : वडगाव नगरपंचायत हद्दीमध्ये आठ कोरोना पाॅझेटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रांताधिकारी संदेश शिर्के यांच्या आदेशानुसार मंगळवार (दि.14) ते गुरुवार (दि.23) जुलै या कालावधीत संपूर्ण वडगाव शहर प्रतिबंधित झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वडगाव नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात दि. 18 जुलैपर्यंत मेडिकल दुकाने व दवाखाने सोडून इतर सर्व आस्थापना बंद राहणार असल्याचे नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांनी सांगितले.  दरम्यान, आजपासून शहरात कडक लॉकडाउनच्या अंलबजावणीला सुरुवात करण्यात आली आहे.

वडगावातील लॉकडाउनचा निर्णय घेतल्यानंतर आज, बुधवार सकाळपासून शहरातील सर्व व्यापारी दुकाने, आस्थापना व अन्य व्यवहार बंद ठेवण्यात आले.

त्याचबरोबर रस्त्यांवरील वर्दळही थंडावली आहे. नेहमी गजबजलेल्या मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर आज शुकशुकाट पाहायला मिळाला.

या लॉकडाऊन कालावधीत दि. 19 जुलैपासून फक्त अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत सुरू राहतील. इतर सर्व दुकाने व आस्थापना पूर्ण बंद राहतील.

घरपोच दूध वितरण सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत, बँकिंग सुविधा सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचेही नगरपरिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

सर्वांनी या आदेशाचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष मयुर ढोरे ,उपनगराध्यक्ष माया चव्हाण, नगरसेवक, मुख्याधिकारी सुवर्णा ओगले व नगरपंचायत प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रांत अधिकारी संदेश शिर्के यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करून नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी केले आहे.

लॉकडाऊनचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांर्तगत कारवाई करण्यात येईल, अशा इशाराही त्यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.